• Fri. Aug 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

जीवनात संघर्षाचे गणित अनुभवले -न्यायाधीश एम.सी. शेख

ByMirror

Aug 13, 2026
सुमारे 2000 विद्यार्थ्यांचा सहभाग

एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीची 51 वी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा दिमाखात


सुमारे 2000 विद्यार्थ्यांचा सहभाग


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शालेय जीवनापासूनच संघर्षाची सवय लावली पाहिजे. जीवनात कोणतेही यश सहज मिळत नाही. प्रत्येक यशामागे आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची अथक मेहनत असते. शिक्षणातून गुणवत्ता सिद्ध करूनच पालकांप्रती खरी कृतज्ञता व्यक्त करता येते. मी स्वतः विद्यार्थी दशेपासून संघर्षाचे गणित अनुभवले आहे. त्या संघर्षानेच मला धैर्य, शिस्त आणि यशाचा मार्ग दाखविला. त्यामुळे आज या जबाबदारीच्या पदापर्यंत पोहोचताना संघर्षाचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन न्यायाधीश श्रीमती एम.सी. शेख यांनी केले.


एव्हरेस्ट अबॅकस अकडमीच्या वतीने आयोजित 51 व्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी न्यायाधीश शेख (पारनेर दिवाणी न्यायालय) बोलत होत्या. याप्रसंगी स्नेहल झांबरे (सचिव, संस्कार भारती, अहिल्यानगर शाखा), पोपट सोनवणे, शिवराम लंके, प्रा. डॉ. के. व्ही. वागस्कर, अशोक कार्ले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि अबॅकस मण्यांच्या पाटीचे पूजन करून झाली.स्वागत व प्रास्ताविकात रेश्‍मा कळमकर यांनी अकॅडमीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर डॉ. घडेकर यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या अबॅकस डेमोमधून विद्यार्थ्यांच्या यशाची चुणूक दाखवली.


एव्हरेस्ट बेस्ट टीचर पुरस्काराच्या अनिता कोकाटे ,अंकिता सानप,कलिका गांडाळ ,योगिता काळे,प्रियंका पालवे आदी मानकरी ठरल्या तर एव्हरेस्ट स्टार टीचर अवॉर्डसाठी रेश्‍मा कळमकर,सुवर्णा ठोकळ,पूनम मुथा यांना गौरवण्यात आले,एव्हरेस्ट गॅलेक्सी टीचर पुरस्कारासाठी रेश्‍मा कळमकर पूनम मुथा पात्र ठरल्या.


चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरलेले विद्यार्थी- सत्यम भामरे, पार्थ खेडकर ,सुयश रासकर आदी विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये रोख व भव्य करंडक प्रदान करण्यात आला.या विदयार्थ्यानी 5 मिनिटात 200 पेक्षा जास्त बेरजा , आणि गुणाकार करत मागील उच्चांक मोडून नवीन उच्चांक प्रस्थापित केला .
लहान गटात ध्रुव पवार ,निर्वी काटे ,स्वराज ठुबे, अनन्या दाते ,शिवन्या हुलवळे, यज्ञेश दाते, शरयू कोळगे, ,ओम पाचलिंग, श्रेयश खरपुडे, विराट गाडे, वसुधा राजगुडे , कार्तिकी खरमाळे, शुभ्रा वराळ , प्रज्वल कुलकर्णी,स्नेहल काळे , , शौर्य नेमाने, शौर्य नेमाने, अथर्व बाबर ,रुद्र शिंदे यांनी चॅम्पियन पद पटकावले.


मोठ्या गटात वेदिका करडुले,आयुष कावरे ,प्रांजल चेमटे,प्रगती लांडगे, गौरवी रोखले आण्वित गावडे ,अजिंक्य लोखंडेश्रेयश काटे, समृद्धी झिपुर्डे, आर्या हिंगे, राज कुशवाह, त्रिवेणी गवळी, आयुष ठोकळ, संजीवनी गुंड यांच्यासह तसेच एव्हरेस्ट अबॅकस मास्टर्स या विशेष कॅटेगिरीसह विविध गटांमध्ये विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले, तर आभार अभय कार्ले यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *