पिसाळ बंधूंची सुवर्ण कामगिरी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील राष्ट्रीय खेळाडू विराज पिसाळ व क्षितिज पिसाळ या बंधूंनी बेंगलोर येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली. दोन्ही खेळाडू केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 अहिल्यानगर या शाळेच्या माध्यमातून जलहली बेंगलोर येथील केंद्रीय विद्यालय संघटन समिती अंतर्गत खेळल्या गेलेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
दोन्ही बंधूंची स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. विराज गजेंद्र पिसाळ हा 19 वर्षा वयोगटात 51 ते 55 किलो वजन गटात खेळला असून, क्षितिज पिसाळ 14 वर्षे वयोगटात 31 ते 35 किलो वजनगटात खेळला आहे. सदरच्या स्पर्धा 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट मध्ये पार पडल्या. दोन्ही खेळाडूंच्या यशाबद्दल केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 चे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच एकलव्य तायकंदो स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व प्रशिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही खेळाडू अहिल्यानगर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. गजेंद्र पिसाळ व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक शाळेचे उपशिक्षिका स्मिता पिसाळ यांचे मुले असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जेष्ठ संचालक अंबादास पिसाळ यांचे नातू आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

