• Thu. Aug 6th, 2026

Mirrornews24

Marathi News

एमआयडीसीचा 64 वा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

ByMirror

Aug 5, 2026
कृष्णाली व कृष्णप्रित वेलफेअर फाउंडेशनचा पुढाकार

कृष्णाली व कृष्णप्रित वेलफेअर फाउंडेशनचा पुढाकार


रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; ‘गंध मराठी मातीचा’ हा सांगीतिक कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) च्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त एमआयडीसी प्रशासन तसेच कृष्णाली व कृष्णप्रित वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये भव्य रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, ‘गंध मराठी मातीचा’ हा सांगीतिक कार्यक्रम तसेच प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
औद्योगिक विकासाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत रक्तदान, शिक्षण, पर्यावरण, आरोग्य आणि जनजागृतीच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सातत्याने राबविणासाठी एमआयडीसी यांच्यासह कृष्णाली व कृष्णप्रित वेलफेअर फाउंडेशनने योगदान देत आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ‘गंध मराठी मातीचा’ या सांगीतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. सुप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानातून मराठी भाषा, संस्कृती, साहित्य आणि सामाजिक मूल्यांवर मार्गदर्शन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


याप्रसंगी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड यांनी एमआयडीसीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या औद्योगिक प्रगतीचा आढावा घेत राज्याच्या विकासातील महामंडळाच्या योगदानावर प्रकाश टाकला. औद्योगिक विकासासोबत समाजाप्रती असलेली जबाबदारीही महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी कृष्णाली व कृष्णप्रित वेलफेअर फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. “फाउंडेशनने समाजहिताचे उपक्रम अशाच सातत्याने राबवावेत. एमआयडीसी प्रशासनाकडून भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,” असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.


वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. या शिबिरासाठी जनकल्याण रक्तकेंद्र, अहिल्यानगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रक्तकेंद्राचे अध्यक्ष अभय मेस्त्री, कार्यवाह सतीश इंदानी, डॉ. प्रसाद इटकर, विलास मढीकर, शरद बळे, सामाजिक कार्यकर्त्या मनिषा जोशी, सुलभा पवळ, तेजल हांडे तसेच वाहनचालक खुशाल खरमाळे यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष योगदान दिले.


याच कार्यक्रमात विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाला प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड, आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, सरदार अनुसे (उप अभियंता, म.ओ.वि.म. विद्युत उपविभाग), श्री. संदीप बडगे (उप अभियंता, म.ओ.वि.म. स्थापत्य उपविभाग), कृष्णाली व कृष्णप्रीत वेल्फेअर फाउंडेशनचे संचालक प्रशांत पाटील शेळके, राहुल बळी, प्रवीण टेकाळे (क्षेत्र व्यवस्थापक), प्रदीप शिरसाठ, अमित गायकवाड, सेवानिवृत्त पांडुळे तसेच एमआयडीसीचे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी डोंगरे व इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रियंका पाटील शेळके यांनी केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *