• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

सावेडीत 29 जुलै रोजी ‘गुरु पौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन

ByMirror

Jul 23, 2026

सद्गुरु ओशो रजनीश यांच्या विचारांचा होणार जागर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- परमपूज्य सद्गुरु ओशो रजनीश यांच्या दिव्य विचारांचा आणि आध्यात्मिक वारशाचा जागर करत सावेडी येथील एकवीरा चौक परिसरातील ‘शांतिकुटीर’ येथे बुधवार, दिनांक 29 जुलै रोजी भव्य ‘गुरु पौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. योग जागृती केंद्र आणि कॉस्मिक आर्ट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा सोहळा कृतज्ञता, प्रेम आणि समर्पणाच्या भावनेने साजरा होणार आहे.


हा सोहळा सायंकाळी 6:30 ते रात्री 8:30 या वेळेत संपन्न होईल. या महोत्सवाचे मुख्य सूत्र ‘Insight & Intuition’ (अंतर्दृष्टी व अंतःप्रेरणा) आणि ‘Self-knowledge’ (आत्मज्ञान) हे असून, स्वामी आत्मो कुटीर हे उपस्थितांना विशेष मार्गदर्शन व ध्यानसाधना करवून घेणार आहेत. आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या सद्गुरु ओशो रजनीश यांच्या प्रकाशाचा उत्सव साजरा करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


हा सोहळा सर्वांसाठी पूर्णपणे खुला (Open to All) असून वृद्धेश्‍वर कॉलनी, संदीपनी अकॅडमीच्या मागे, एकवीरा चौक, सावेडी, अहिल्यानगर येथील ‘शांतिकुटीर’ येथे पार पडेल. तरी अहिल्यानगरमधील सर्व नागरिकांनी, ओशो प्रेमींनी, साधकांनी आणि अध्यात्मप्रेमींनी या महोत्सवाचा व ध्यानसाधनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी आत्मो कुटीर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्वामी आत्मो कुटीर 9881303771 व शिवाजी साळवे 9822964895 यांना संपर्क करण्याचे म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *