• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

महिला व ज्येष्ठांसाठी एसटी कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सामाजिक उपक्रम

ByMirror

Jul 13, 2026
भिंगारमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

भिंगारमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांच्या विचारांची पायाभरणी शिक्षणातून व्हावी -संपत बारस्कर


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याच्या उद्देशाने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याचबरोबर महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवास सवलत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, तर एसटी कार्डची प्रक्रिया घराजवळच पूर्ण झाल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शिवम भंडारी यांच्या पुढाकारातून आणि आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संपत बारस्कर, श्री विशाल गणेश देवस्थानचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते, भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, अनिल तेजी, मारुती पवार, संपत बेरड, ज्ञानेश्‍वर फासे, दीपक लिपाणे, सुदाम गांधले, दिनेश लंगोटे, प्रमोद जाधव, दीपक राहिंज, नवनाथ मोरे, एकनाथ मोरे, प्रज्योत लुनिया, रवी नामदे, प्रशांत डावरे, आकाश जाधव, जाधव मामा, ओम भंडारी, मिलिंद लालबोंद्रे, अनिल दळवी, गणेश उपरे, ओंकार उदबत्ते, श्रीकांत तावरे, उमेश गलांडे, भारस्कर गोत्राळ, अनिल दिवटे, आदित्य दिवटे, विजय भंडारी, सुदाम बोंदर्डे, दिलीप आस्मर, गजानन भंडारे, संदीप टेके, अनिल सोळसे, राजू कुरकुटे, रामकिसन बाबर, मीना मोरे, अलका भंडारी, सुरेखा लांडगे, राणी लोखंडे, सोनल लुणिया, शितल कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कुंभार गल्ली परिसरातील महिलांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, या भागात पूर्वी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अत्यंत गंभीर होता. पाण्यासाठी महिलांना टेकाड भागात जाऊन डोक्यावर हंडे वाहून पाणी आणावे लागत होते. मात्र आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून परिसरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते, जलवाहिन्या व नियमित पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे महिलांची मोठी गैरसोय दूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले.


संजय सपकाळ म्हणाले की, “भिंगारच्या विकासाला अनेक वर्षे मर्यादा आल्या होत्या. मात्र आमदार संग्राम जगताप यांनी भिंगारसाठी तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून विकासकामांना गती दिली. गल्लीबोळातील रस्ते, पिण्याचे पाणी, नागरी सुविधा, गटारी, सार्वजनिक विकासकामे यांना प्राधान्य देण्यात आले. केवळ आश्‍वासनांवर राजकारण न करता प्रत्यक्ष काम करण्याची त्यांची कार्यशैली नागरिकांनी अनुभवली आहे. अवघ्या आठ दिवसांत जॉगिंग ट्रॅकसाठी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. योग भवन आणि आरोग्यविषयक सुविधा निर्माण करून नागरिकांना निरोगी जीवनशैलीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याचे त्यांनी सांगितले.


संपत बारस्कर म्हणाले की, “आजची लहान मुले ही उद्याच्या भारताचे सक्षम नागरिक आहेत. त्यांच्यामध्ये बालपणापासूनच छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संस्कार होणे अत्यंत आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे चरित्र वाचले, त्यांचे विचार समजून घेतले तर त्यांच्यात सामाजिक जाणीव, समता, बंधुता आणि राष्ट्रप्रेमाची भावना विकसित होईल. समाज घडविणाऱ्या या विचारांची पायाभरणी शिक्षणातून झाली पाहिजे. याबाबत विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर विद्यार्थ्यांना शालेय बॅग देण्याचे जाहीर केले.


शिवम भंडारी म्हणाले की, सामाजिक जबाबदारी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. भिंगारमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी सोडविण्यासाठी योगदान देत आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणेतून सामाजिक, शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आरोग्य शिबिरे आणि विविध जनकल्याणकारी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, समाजाचा सर्वांगीण विकास शिक्षणातूनच शक्य आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी मिळणारी छोटीशी मदतही त्यांच्या भविष्यासाठी मोठी प्रेरणा ठरते. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून भिंगारचा देखील विकास साधला जात असल्याचे सांगून, त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तर महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या एसटी कार्ड नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *