39 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले
गुणवंतांचा छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलने पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी ) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये एकूण 39 विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या प्रमुख छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक कैलास साबळे, उपमुख्याध्यापक निलेश भालेराव, पर्यवेक्षक नीलिमा शिंदे, रेणुका परदेशी व पाटील यांच्यासह मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना छायाताई फिरोदिया यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शैक्षणिक गुणवत्तेत सातत्य राखण्याचे आवाहन केले. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाची पहिली पायरी असून, याच जिद्दीने आणि सातत्याने अभ्यास करत भविष्यातील मोठ्या स्पर्धा परीक्षांसाठी स्वतःला तयार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीच्या 20 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. यामध्ये आनंदी दहातेांडे , समर्थ कवाष्टे , स्वराज कार्ले, ओवी बडवे, सत्यजीत फुलसौंदर, सात्विक काळे, कृष्णवीर जगदाळे, पृथ्वीराज कदम, स्वरा कराळे, शर्वरी जोशी, आरुषी जाधव, ध्रुमिल चांडवले, सर्वेश रांधवन, सुरज डावखर, हिमांशू सोळुंके, दूर्वा निमसे, श्रावणी पानकडे, अक्षरा काळे, तेजश्री काटे, यशराज गिते या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या विद्यार्थ्यांना वैशाली मेहेर, अतुल बोरुडे, बाळासाहेब पालवे, शितल डिमळे, अपर्णा कमलकर, मंजुषा शिवगुंडे, मीनाताई कोकाटे आणि सविता जासुद यांनी मार्गदर्शन केले.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीच्या 19 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. यामध्ये गिरिजा तनपुरे , इंदिरा देवकर, अतुल कराळे, राजनंदनी जाधव, सुजल घालमे, राघव ठिपसे, विक्रांत साळुंके, विनीत कदम, आयुष भोंडवे, अर्जुन दिघे, मल्हार डोंगरे, सार्थक अस्तगावकर, अविष्कार घोडके, अथर्व आमले, धर्मराज खोले, विराट भोसले, ओंकार शिंदे, अनन्या मिसाळ, विश्वेश गायकवाड या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या विद्यार्थ्यांना शैला औटी, राजलक्ष्मी कुलकर्णी, अतुल पटवा, शिल्पा नगरकर, अंजली गोले, सुलभा कुलकर्णी, वैभव पडोळे आणि सुषमा मुदगल यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, विश्वस्त ॲड. गौरव मिरीकर तसेच विश्वस्त मंडळातील सर्व सदस्यांनी गुणवंत विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

