अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लालटाकी येथील हाजी जाफर मुश्ताक हुसेन (वय 80 वर्षे) यांचे वृध्दापकाळाने नुकतेच निधन झाले. ते तांबटकर गल्ली येथे जुन्या काळातील फॅब्रिकेशनचे प्रसिध्द व्यावसायिक होते.
त्यांच्या पश्चात आठ मुली, दोन मुले, सुना, नातवंडे, पंतू असा मोठा परिवार आहे. माजी उपमहापौर हाजी नजीर हुसेन यांचे चुलते, ज्येष्ठ वृत्त छायाचित्रकार राजू शेख यांचे सासरे व नूर शेख वेल्डिंगवाले यांचे ते वडिल होते. धार्मिक व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
