• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

रविवारी शहरात जायंटसची द्वितीय कौन्सिल मीटिंग व सहेली सिंपोझीयमचे आयोजन

ByMirror

May 14, 2026
राज्यभरातील महिला प्रतिनिधींची राहणार उपस्थिती

राज्यभरातील महिला प्रतिनिधींची राहणार उपस्थिती

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक दर्जावर सामाजिक कार्य करणाऱ्या जायंटस वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन दोन ब ची द्वितीय कौन्सिल मीटिंग व सहेली सिम्पोझियमचे अहिल्यानगर शहरात रविवार दि. 17 मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल यश पॅलेस येथे होणाऱ्या या बैठकीसाठी फेडरेशन कौन्सिलच्या सर्व पदाधिकारी व सहेली सिंपोझीयमसाठी राज्यातील सर्व महिला प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती जायंट्सचे स्पेशल कमिटी मेंबर संजय गुगळे यांनी दिली.


जायंटस वेल्फेअर फाउंडेशन ही एक समाजसेवी संस्था असून, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. नाना चुडासामा यांनी 1973 मध्ये मुंबई येथे या संस्थेची भारतीय संस्था म्हणून स्थापना केली. त्यानंतर परदेशात या संस्थेने आपल्या शाखा सुरू केल्या. भारतात 600 शाखेद्वारे काम सुरू असून 25 हजाराचे वर सदस्य यामध्ये सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक ,वैद्यकीय अशा क्षेत्रात काम करीत आहे. जायंट्‌स ग्रुप ऑफ अहिल्यानगरच्या वतीने गेली 40 वर्ष संस्थापक संजय गुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये विविध अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. या समाजोपयोगी उपक्रमाची दखल घेऊन ग्रुपला राज्य व आंतरराष्ट्रीयस्तरावर अनेकदा गौरविण्यात आले आहे.


फेडरेशन 2 ब मधील पदाधिकाऱ्यांची द्वितीय कौन्सिल मीटिंग व सहेली सिंपोझियम मीटिंग चे आयोजन जायंटस ग्रुप ऑफ अहिल्यानगरच्या वतीने करण्यात आलेले आहे. याप्रसंगी निसर्गोपचार तज्ञ हेमा सेलोत तज्ञ आहार आणि योगावर मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रा. आशा कव्हाणे महिला सक्षमीकरणावर संवाद साधणार आहेत. ही मीटिंग यशस्वी होण्यासाठी अहिल्यानगर ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सचिव अमित मुनोत व प्रकल्प प्रमुख अनिल गांधी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *