• Fri. May 8th, 2026

पी.ए. इनामदार ज्युनिअर कॉलेजचा एचएससी बोर्डात उत्कृष्ट निकाल

ByMirror

May 7, 2026

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; उम्मे अम्मारा शेख प्रथम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील यस इंडिया फाऊंडेशन संचलित पी.ए. इनामदार इंग्लिश मिडीयम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजने इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या एचएससी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.


यावर्षीच्या बारावी विज्ञान शाखेच्या निकालात विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले. कॉलेजच्या गुणवत्ता यादीत उम्मे अम्मारा अल्ताफ शेख हिने 76 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. आफरीन फिरोजोद्दीन मुल्ला हिने 61.83 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर आमेना कदीर शेख हिने 60.17 टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांकावर स्थान मिळवले.


विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कॉलेजमध्ये गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य युनूस सलीम, डारेक्टर शब्बीर मोहंमद सी. तसेच उपप्राचार्या फरहाना शेख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


संस्थेचे चेअरमन अब्दुल रहिम खोकर, व्हाईस चेअरमन इंजि. इकबाल सय्यद, सचिव विकार काझी आणि अकॅडमिक चेअरमन तथा खजिनदार डॉ. खालिद शेख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कॉलेजमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्षभर दिलेले शैक्षणिक मार्गदर्शन, नियमित सराव परीक्षा, अभ्यासातील सातत्य आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *