• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

कास्ट्राईब महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी पोपट खंडागळे यांची नियुक्ती

ByMirror

Apr 13, 2026
25 वर्षांच्या कार्याची दखल; कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा

25 वर्षांच्या कार्याची दखल; कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पोपट खंडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे राज्य अध्यक्ष एन. एम. पवळे यांनी खंडागळे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.


पोपट खंडागळे यांनी कास्ट्राईब महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदावर तब्बल 25 वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. या काळात त्यांनी कर्मचारी हिताच्या विविध प्रश्‍नांवर सातत्याने आवाज उठवला. शासन दरबारी प्रलंबित असलेल्या अनेक मुद्द्यांवर पाठपुरावा करून त्यांनी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला.


खंडागळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद येथे कार्यकारी अभियंता या महत्त्वाच्या पदावर कार्य करताना विविध विकासकामांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी झाली. ते सारनाथ गृहनिर्माण सहकारी संस्थेचे संस्थापक सदस्य असून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. कर्मचारी संघटनांबरोबरच सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी नेतृत्वाची भूमिका निभावली आहे. समाजातील वंचित घटकांसाठी त्यांचे सातत्याने कार्य सुरु आहे.

एन.एम. पवळे यांनी “खंडागळे यांचा दीर्घ अनुभव आणि कर्मचारी हितासाठीची तळमळ महासंघाच्या कार्याला नवी दिशा देईल. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील कर्मचारी प्रश्‍न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्‍वास व्यक्त केला. या निवडीबद्दल वसंत थोरात, के. के. जाधव, निवृत्ती धांडोरे, समीर वाघमारे, श्‍याम थोरात आदी पदाधिकाऱ्यांनी खंडागळे यांचे अभिनंदन केले. राज्य उपाध्यक्षपदी झालेली निवड ही त्यांच्या दीर्घकालीन सेवाभावी कार्याचा गौरव असून, कर्मचारी चळवळीला नवी ऊर्जा देणारी ठरणार असल्याचा विश्‍वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *