• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

बाबासाहेब गवते यांचा महाराष्ट्र भूषण आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

ByMirror

Apr 7, 2026
शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल

शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समता प्रतिष्ठानच्या (महाराष्ट्र राज्य) वतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बाबासाहेब जालिंदर गवते यांना“महाराष्ट्र भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
नुकतेच झालेल्या शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यात पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते गवते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


आमदार सत्यजित तांबे यांनी गवते यांच्या कार्याचे कौतुक करुन “समाज घडविण्याच्या प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका कणा मानली जाते. गवते यांनी आपल्या ज्ञानदानाबरोबरच कर्तृत्वातून विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. अशा निष्ठावान शिक्षकांचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. त्यांचे कार्य इतर शिक्षकांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना गवते यांनी हा पुरस्कार आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या प्रेमाचे प्रतीक असल्याचे सांगितले. बाबासाहेब गवते यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *