• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त निमगाव वाघा येथे वृक्षारोपण

ByMirror

Mar 26, 2026
एक झाड म्हणजे जीवनाचा आधार -पै. नाना डोंगरे

पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येण्याचे आवाहन; विविध संस्थांचा सहभाग


एक झाड म्हणजे जीवनाचा आधार -पै. नाना डोंगरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.


या उपक्रमामध्ये ग्रामस्थ व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमास डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, लक्ष्मण चौरे, सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, सुनील जाधव, सुभाष फलके, आशा फलके, संदीप डोंगरे, अकबर शेख, मंजाबापू गायकवाड, दीपक आंग्रे, आकाश थोरात आदी उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, आजच्या काळात पर्यावरणाचा समतोल मोठ्या प्रमाणात बिघडत चालला आहे. वाढते प्रदूषण, पाण्याची टंचाई आणि तापमानातील वाढ या समस्या गंभीर होत आहेत. या सर्वांवर उपाय म्हणून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन अत्यंत गरजेचे आहे. आपण फक्त झाडे लावून थांबता कामा नये, तर त्यांचे संगोपन करणे ही आपली जबाबदारी आहे. एक झाड म्हणजे जीवनाचा आधार आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प केला, तर पर्यावरणाचा समतोल राखला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *