• Fri. Mar 13th, 2026

मुकुंदनगर येथे इज्तेमाई खत्ना चे आयोजन

ByMirror

Mar 13, 2026

गरजूंना नाव नोफ्लदणी करण्याचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नुसरा एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने 5 एप्रिल रोजी मुकुंदनगर, गोविंदपुरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात इज्तेमाई खत्ना चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नाममात्र शुल्कात खत्ना करुन मोफत औषधे दिली जाणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


5 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजल्यापासून या उपक्रमास प्रारंभ होणार आहे. मालेगाव येथील खलिफा डॉ. वसीम शेख मुलांची खत्ना करणार आहे. नाव नोंदणीसाठी समीर कुशन हेडकॉटर गेट व्हिन्सेनपुरा व राज जनरेटर्स हातमपुरा येथे नोंदणी करण्याचे सांगण्यात आले आहे. ही नाव नोफ्लदणी 3 एप्रिल पर्यंत करता येणार आहे. प्रथम नोफ्लदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिबिर यशस्वी करण्यासाठी इलियास जहागीरदार, डॉ. जुबेर शेख, अन्सार शेख, नदीम शेख. अबुजर शेख, शफीक शेख, अतहर सय्यद, रिजवान सय्यद, शब्बीर सय्यद आदी परिश्रम घेत आहे. अधिक माहितीसाठी जावेद खान 9273255242, नासिर सर 8080979730, ईलियास शेख 9890786560 व शब्बीर सय्यद 9561354777 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *