• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात पर्यावरणपूरक होळी; स्वच्छता अभियानातून व्यसनमुक्तीचा संदेश

ByMirror

Mar 6, 2026
युवकांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ

बिरोबा मंदिर परिसरात पाला-पाचोळ्याची होळी; होळीत अमली पदार्थाचे दहन


युवकांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबवून पर्यावरणपूरक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. गावातील बिरोबा देवस्थान परिसरात पाला-पाचोळ्याची होळी पेटवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमांतर्गत उपस्थित युवकांना पर्यावरण रक्षण व व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. विशेष म्हणजे, मागील सोळा वर्षांपासून गावात हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविला जात असून, युवकांसाठी जनजागृतीसाठी एक प्रेरणादायी सोहळा बनला आहे. होळीपूर्वी देवस्थान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी तंबाखू, सिगारेट, गुटखा, मावा आदी व्यसनाधीन पदार्थांचे होळीत दहन करण्यात आले. “व्यसनांची होळी करा आणि निरोगी जीवनाचा संकल्प करा” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पर्यावरणाचा बिकट होत चाललेला प्रश्‍न आणि युवकांमध्ये वाढते व्यसनाचे प्रमाण चिंताजनक आहे. तंबाखू, विडी-सिगारेटमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत असून दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.


होळीसाठी हिरवी झाडे तोडून लाकूड जाळण्याऐवजी वाळलेला पाला-पाचोळा वापरल्यास पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले. युवकांनी पुढाकार घेऊन गावात व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी, त्यामुळे गाव निर्मळ व निरोगी राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


या उपक्रमाप्रसंगी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सुभाष फलके, नामदेव भुसारे, आदित्य फलके, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, तन्मय गायकवाड, अशोक लोटके, अजित फलके, सार्थक काळे आदींसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमास मेरा युवा भारत तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *