• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

1 मार्चला शहरात रंगणार राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा

ByMirror

Feb 28, 2026

युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशनच्या वतीने विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

ज्युनिअर, मास्टर ज्युनिअर, लेव्हल 1 ते 5 तसेच वैदिक मॅथ्स या गटांमध्ये रंगणार स्पर्धा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या गणिती कौशल्याला चालना देण्यासाठी युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशन यांच्या वतीने रविवारी (दि. 1 मार्च) शहरात राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा टिळक रोड येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे सकाळी 9 ते 12 या वेळेत पार पडणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनच्या अध्यक्षा हेमलता काळाणे व सर्व सदस्यांनी केले आहे.


ही स्पर्धा ज्युनिअर, मास्टर ज्युनिअर, लेव्हल 1 ते 5 तसेच वैदिक मॅथ्स या गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात सर्व गटांच्या स्पर्धा पार पडतील. गणितातील वेग, अचूकता आणि मानसिक गणनेची क्षमता यांचा कस पाहणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आत्मविश्‍वास वाढवून त्यांची बौद्धिक क्षमता अधिक विकसित करण्याचे प्रयत्न केले जाणार आहे.


दुपारच्या सत्रात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी महापौर ज्योतीताई गाडे, सौ. दिपालीताई बारस्कर (नगरसेविका, अ.नगर), नगरसेविका संध्याताई पवार, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. सौ. उज्वला मुरकुटे, डॉ. हर्षदा मनीष बडे (बी.डी.एस), नगरसेवक निखील वारे, महेश तवले, इक्रा स्कूलचे अध्यक्ष डॉ. शुजाउद्दिन सय्यद तसेच माऊली इंग्लिश मेडिकल स्कूलच्या विद्या संजय उदमले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सर्व गटांतील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक ट्रॉफीसह बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील विजेते विद्यार्थी नॅशनल व इंटरनॅशनल स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *