• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर महिला व वस्तीगृहातील मुलींच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या

ByMirror

Feb 28, 2026
महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर महिला व वस्तीगृहातील मुलींच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या

सेवाप्रीत सोशल फाउंडेशन व साईदीप सह्याद्री हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम; तीन दिवसीय तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

महिला सशक्तीकरणाची खरी सुरुवात आरोग्यापासून होते -जागृती ओबेरॉय

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर महिलांच्या निरोगी आयुष्यासाठी सेवाप्रीत सोशल फाउंडेशन व साईदीप सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात शहरातील महिला तसेच वस्तीगृहातील मुलींच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.


शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, ग्रुप लीडर सविता चड्डा, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैशाली किरण, सुशिला मोडक, ग्रुप लीडर अर्चना खंडेलवाल, गीता नय्यर, रितू वधवा, गीता माळवदे, सिमरन वधवा, अन्नू थापर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या प्रसंगी सविता चड्डा, डॉली मेहेता, रीटा सलूजा, अनिता शर्मा, वैशाली मालपाणी, आंचल बिंद्रा, अनिता गाडे, डॉली भाटिया, अनुभा ॲबट, सोनिया ॲबट, बीना बत्रा, शारदा बिहानी, कीर्ती बोरा, अपर्णा बोथरा, चैताली बोराटे, दीपा चंगेडिया, संगीता ओबेरॉय, प्रीती सोनवणे, रंजना झिंजे, शीतल कोठारी, विजय सारडा, मनीषा लोढा, रिध्दी मनचंदा, कैलाश मेहेता, मंगला, योजना बोठे, करुणा मुनोत, विजया सारडा, सविता बारमेचा, शिल्पा सबलोक, वैशाली गुगळे, कृष्णा काबरा, कांचन निहलानी, किट्टू गोल, किट्टी मल्होत्रा, साधना बिहानी, उषा धवन, सुनीता गांधी, शिल्पा गांधी, श्‍वेता गांधी, गीता शर्मा, जान्वी नारंग, मंगल झंवर, रूपा पंजाबी, सुवर्णा गाडेकर आदी उपस्थित होते.


डॉ. वैशाली किरण म्हणाल्या की, “महिलांनी आपल्या आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. शरीरातील प्रत्येक लक्षाकडे लक्ष द्यावे. विशेषतः मधुमेह, थायरॉईड आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग यांसारखे आजार सुरुवातीला लक्षणे न दाखवता वाढतात. नियमित तपासणीमुळे आजारांचे लवकर निदान होऊन उपचार सोपे होतात. प्रत्येक महिलेने वर्षातून किमान एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर योग्य आहार घेऊन नियमीत व्यायाम करण्याचे त्यांनी आवाहन केले.
जागृती ओबेरॉय यांनी महिला सशक्तीकरणाची खरी सुरुवात आरोग्यापासून होते. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे. अल्प दरात तपासण्या उपलब्ध करून देत महिलांमध्ये आरोग्यजागृती निर्माण करणे हा या शिबिरामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
सविता चड्डा म्हणाल्या की, महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे अत्यंत आवश्‍यक आहे. या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महिलांच्या जागरूकतेचा पुरावा आहे. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या शिबिराच्या माध्यमातून सुमारे अडीच हजार रुपयांच्या विविध तपासण्या महिलांना अल्प दरात करून देण्यात आल्या होत्या. तसेच वस्तीगृहातील मुलींच्या सर्व तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. महिलांच्या रक्ताच्या विविध तपासण्या, मधुमेह, थायरॉईड, गर्भाशय मुखाचा कर्करोग यांसह मुलींच्या रक्त, कॅल्शियम व आयर्न तपासण्या करण्यात आल्या.
याशिवाय साईदीप सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वॉकथॉनमध्ये सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिला सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. संपूर्ण तपासण्या डॉ. वैशाली किरण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. व्यंकटेश मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *