• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगर येथे 18 फेब्रुवारी रोजी “पेन्शन अदालत”

ByMirror

Feb 16, 2026
आर्थिक व निकट संबंध असल्याने कारवाई रोखली जात असल्याचा आरोप

कोषागार कार्यालय व महालेखापाल, मुंबई यांचा संयुक्त उपक्रम


प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी सेवानिवृत्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर कोषागार कार्यालय आणि महालेखापाल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त वेतनधारकांच्या अडचणी सोडविण्यासाठी बुधवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी “पेन्शन अदालत” आयोजित करण्यात आली आहे. ही पेन्शन अदालत सकाळी 10.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद येथे पार पडणार आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन संदर्भातील विविध प्रश्‍न, तांत्रिक अडचणी, त्रुटीमुळे प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच वेतननिर्धारणातील शंका यांचे मार्गदर्शन या बैठकीत करण्यात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष संवाद साधून समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


या पेन्शन अदालतमध्ये विविध राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक देखील उपस्थित राहणार असून बँक व्यवहार, पेन्शन जमा होण्यातील अडचणी, जीवन प्रमाणपत्र, खाते संबंधित त्रुटी आदी विषयांवर मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
ज्या सेवानिवृत्तांचे प्रकरणे कागदपत्रांच्या त्रुटीमुळे अथवा तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित आहेत, त्यांनी आवश्‍यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.


रमेश देशमुख यांनी सर्व सेवानिवृत्त वेतनधारकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. “पेन्शन अदालत” हा उपक्रम सेवानिवृत्तांच्या प्रश्‍नांचे जलद आणि पारदर्शक निराकरण करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *