• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगर शहरात भाजपच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा ‘समर्पण दिन’ साजरा

ByMirror

Feb 12, 2026
शक्ती केंद्र स्थळी प्रतिमा पूजन

शक्ती केंद्र स्थळी प्रतिमा पूजन


पंडित दीनदयालजींनी मांडलेला ‘अंत्योदय’ हा विचार कार्यकर्त्यांसाठी मुख्य प्रेरणा -सविता कोटा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनसंघाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्यानगर शहरात भाजपच्या वतीने ‘समर्पण दिन’ साजरा करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत नगर कल्याण रोड, छत्रपती शिवाजी नगर येथील शक्ती केंद्र प्रमुख सौ. सविता प्रकाश कोटा यांच्या निवासस्थानी असलेल्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या नियोजनाखालील बूथ क्र. 172, 173, 174 व 175 मधील कार्यकर्त्यांनी एकत्र येत पंडितजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.


भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या आदेशानुसार, तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून शक्ती केंद्र आणि बूथ स्तरावर हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार भाजपच्या वैचारिक चिंतनावर आधारित पार पडला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नेत्या तथा भाजप शहर जिल्हा उपाध्यक्षा सौ. कालिंदी केसकर यांनी पंडितजींच्या वैचारिक वारशावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “पंडितजींचे जीवन म्हणजे व्यक्तिगत नि:स्वार्थ राष्ट्रसेवेचा आदर्श असल्याचे स्पष्ट केले.


सौ. सविता प्रकाश कोटा म्हणाल्या की, “पंडित दीनदयालजींनी मांडलेला ‘अंत्योदय’ हा विचार कार्यकर्त्यांसाठी मुख्य प्रेरणा आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवणे आणि बूथ स्तरावर संघटन मजबूत करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” तसेच भाजप मध्यमंडळ चिटणीस सौ. सोनाली पाठक यांनी ‘एकात्म मानववाद’ विषयावर मार्गदर्शन केले, तर भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ. सुनंदा नागुल (गंजी) यांनी आभार मानले.


या समर्पण दिनानिमित्त रेणुका न्यालपेल्ली, अनिता शिंदे, शीला जाधव, मुक्ता चौथे, संगीता मंचेवर, शोभा कोटा, योगिता ढुमने, एक्कदेवी, वल्लाकट्टी (अम्मा), गीता बुरगुल, दीपाली तुम्मा यांच्यासह छत्रपती शिवाजी नगर परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संघटनेच्या आदेशानुसार, कार्यकर्त्यांनी नमो ॲपच्या माध्यमातून ‘मायक्रो डोनेशन’ (Micro Donation) करून आपला खारीचा वाटा उचलला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *