• Tue. Feb 10th, 2026

नवनिर्वाचित उपमहापौर धनंजय जाधव यांचा सत्कार

ByMirror

Feb 10, 2026

लालटाकी भारस्कर कॉलनी व मातंग समाजाच्या वतीने प्रभू श्रीराम यांची मूर्ती भेट देऊन सन्मान


सर्व समाज घटकांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जाणार -धनंजय जाधव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी धनंजय जाधव यांची निवड झाल्याबद्दल लालटाकी भारस्कर कॉलनी व मातंग समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमात समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवनिर्वाचित उपमहापौरांचे अभिनंदन केले.


या कार्यक्रमास समाजाचे ज्येष्ठ नेते चंदूभाऊ काळोखे, रामभाऊ वडागळे, शाहूराजे वडागळे, विनोद शिरसाठ, जय वडागळे, गणेश शिरसाठ, प्रथमेश शिरसाठ, राम काते, रोहित वडागळे, प्रकाश वडागळे, भीमा वडागळे, विनीत वडागळे, अक्षय काते, मनीष वडागळे, रितेश डाके, विजय ढोले, विशाल वडागळे आदी मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी उपमहापौर धनंजय जाधव यांचा पारंपरिक पद्धतीने फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्यांना पुष्पगुच्छ देऊन प्रभू श्रीराम यांची मूर्ती भेट देण्यात आली.


धनंजय जाधव यांनी सत्कार स्वीकारताना सर्व समाज घटकांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. रामभाऊ वडागळे म्हणाले की, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी धनंजय जाधव यांची निवड ही केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, सर्वसामान्य समाजाच्या अपेक्षांचा विजय आहे. धनंजय जाधव हे सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी नेहमीच पुढे राहिलेले नेतृत्व आहे. आपल्या परिसरातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांचे सहकार्य लाभणार असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *