• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

न्यू आर्ट्‌सचा प्रियज करपे याची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

ByMirror

Nov 30, 2025
न्यू आर्ट्‌सचा प्रियज करपे याची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

उझबेकिस्तान मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक गेमसाठी करणार भारताचे प्रतिनिधित्व

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नुकत्याच कर्नाटक, बेळगाव येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत न्यू आर्ट्‌स कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजचा (स्वायत्त) कुस्तीपटू प्रियज संतोष करपे याने 55 किलो वजन गटात चमकदार कामगिरी करून सुवर्ण पदक पटकाविले. त्याची महाराष्ट्र कुस्ती असोसिएशन तर्फ मिशन ऑलम्पिक गेमसाठी उझबेकिस्तान येथे निवड झाली आहे. 6 डिसेंबर ते 20 दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.


या कामगीरीबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापक, सेक्रेटरी ॲड. विश्‍वासराव आठरे पाटील, सहसचिव मुकेशदादा मुळे, खजिनदार दिपलक्ष्मी म्हसे, जेष्ठ सदस्य नंदकुमार झावरे, जी.डी. खांदेशे, जयंत वाघ, व संस्थेचे सदस्य व पदाधिकारी यांनी करपे याचे अभिनंदन करुन त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


संस्थेचे सर्व सदस्य पदाधिकारी व महाविदिद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, उपप्राचार्य डॉ.अनिल आठरे, डॉ. संजय कळमकर, महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख, प्रबंधक बबण साबळे, अधिक्षक राजू पाटील, जगन्नाथ सावळे यांनी अभिनंदन केले. प्रियज करपे याला श्री सदगुरु क्रीडा लक्ष तालमीचे वस्ताद करपे तात्या, तसेच जिमखाना विभाग प्रमुख डॉ. शरद मगर, प्रा. धन्यकुमार हराळ यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *