• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात निघाली संविधान जागर रॅली

ByMirror

Nov 27, 2025
संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वेधले ग्रामस्थांचे लक्ष

संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वेधले ग्रामस्थांचे लक्ष


संविधानाने देशात मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला -नाना डोंगरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, मेरा युवा भारत, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संविधान जागर रॅली काढण्यात आली. संविधान दिनानिमित्त निघालेल्या या रॅलीने ग्रामस्थांचे लक्ष वेधले. भारतीय संविधानाचा विजय असो…च्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.

गावातील नवनाथ विद्यालयापासून निघालेल्या रॅलीचे प्रारंभ मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, रेखा जरे, मंदा साळवे, आप्पासाहेब कदम, प्रमोद थिटे, शरद भोस, स्वाती इथापे, तेजस केदारी, निकिता रासकर, दिपाली ठाणगे, तुकाराम पवार, प्रशांत जाधव, लहानबा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने संविधान जागर रॅलीत सहभागी झाले होते.


प्रारंभी मुंबई येथे झालेल्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन यावेळी करण्यात आले. पै. नाना डोंगरे म्हणाले की, संविधानाने देशात मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला असून, संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी संविधानाने राजेशाही संपुष्टात येऊन सर्वसामान्य मतदारांच्या हातात देशाची सूत्रे आली. संविधानाने देशात समता, बंधुता व स्वातंत्र्यता प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट केले.


या उपक्रमासाठी कार्यक्रमास नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे आणि रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *