जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने कास्ट्राईबचे नूतन जिल्हा कार्याध्यक्ष समीर वाघमारे यांचा सत्कार
नगर (प्रतिनिधी)- शासन व कर्मचाऱ्यांमधील दुवा म्हणून कास्ट्राईब संघटना राज्यभर कार्यरत आहे. संघटनेने मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय, हक्क मिळवून देण्याचे कार्य केले आहे. संघटनेला मोठा इतिहास असून, शासन स्तरावर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू असल्याचे प्रतिपादन कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांनी केले.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी समीर वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, राज्य अध्यक्ष एन.एम. पवळे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, राज्य उपाध्यक्ष वसंतराव थोरात, राज्य महासचिव प्रा. सुहास धीवर, उपमहासचिव निवृत्ती आरु, उपसचिव छानराज क्षेत्रे, बाळासाहेब शिंदे, अक्षय वाकचौरे, राहुल गलांडे, श्याम थोरात, सोमनाथ शिंगडे, सुदाम जाधव, पवन फाटके, प्रवीण बुऱ्हा, पल्लवी तुंगार, गणेश दिक्षीत, दिपाली म्हस्के, पवन थोरात, ज्ञानेश्वर जाधव, शिंगाडे, प्रमोद देशमुख आदींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
के.के. जाधव म्हणाले की, संघटनेत क्रीयाशील सदस्यांना पदाच्या माध्यमातून संधी देण्यात येत आहे. संघटनेचे सर्वच रिक्तपदे भरुन संघटनेत ऊर्जित अवस्था निर्माण करण्यात आली आहे. 17 ऑगस्ट रोजी संघटनेची जिल्हाव्यापी बैठक होणार असून, यामध्ये संघटनेची वाटचाल व विविध प्रश्नासंदर्भात चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी वाघमारे यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित जिल्हा कार्याध्यक्ष समीर वाघमारे यांनी संघटनेच्या ध्येय-धोरणानुसार कर्मचाऱ्यांच्या न्याय-हक्काचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य केले जाणार असल्याचे सांगितले.
