• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

शेवगावात आजपासून रंगणार देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार

ByMirror

Jun 3, 2025
मातीचे आखाडे सज्ज; तोडीस तोड मल्ल भिडणार

मातीचे आखाडे सज्ज; तोडीस तोड मल्ल भिडणार

नगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथील खंडोबानगर मैदानावर आजपासून देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेच्या ठिकाणी दोन मातीचे आखाडे सज्ज करण्यात आले असून, प्रेक्षकांना बैठण्यासाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा या स्पर्धेचे आयोजक अरुण मुंढे आणि जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांनी दिली.


बुधवारी (दि.4 जून) सकाळ पासून कुस्तीपटूंचे वजन होणार आहे. तर सायंकाळी तारकेश्‍वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज, राम महाराज झिंजुर्के व प्रशांत (नाना) भालेराव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून, जिल्ह्यातून आलेल्या कुस्तीपटूंना राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अत्यंत नियोजनबध्दपणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत लहान गटांपासून मोठ्या गटांपर्यंत एकूण 9 गटात मातीवर कुस्त्या होणार आहे. सर्व विजयी मल्लांसाठी भरघोस बक्षिसांचे नियोजन करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *