• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त राजपूत समाज सेवा संस्थेचा उपक्रमशील उत्सव

ByMirror

May 12, 2025
मोटरसायकल रॅली, रक्तदान शिबिर आणि गुणवंतांचा गौरव

मोटरसायकल रॅली, रक्तदान शिबिर आणि गुणवंतांचा गौरव


नगर (प्रतिनिधी)- राजपूत समाज सेवा संस्था, अहिल्यानगर यांच्या वतीने महाराणा प्रताप यांची 485 वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने संस्थेने शहरात भव्य मोटरसायकल रॅली काढून महाराणा प्रताप यांच्या शौर्याचे स्मरण करत जनजागृती केली. रॅलीदरम्यान देशभक्तिपर गीते आणि जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.


नगर-पुणे महामार्गावरील ओम गार्डन येथे पार पडलेल्या अभिवादन सोहळ्यात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी महाराणांच्या शौर्य, स्वाभिमान आणि स्वातंत्र्यप्रियतेच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी नाशिक कारागृह अधीक्षक प्रकाश परदेशी, तोफखाना पोलीस ठाण्याचे स.पो.नि. उज्ज्वलसिंह राजपूत, स.पो.नि. पूनम श्रीवास्तव, स.पो.नि विनोदसिंह अरुणसिंह परदेशी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व उद्योजक रणजित विजयसिंह परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.


या जयंतीनिमित्त समाजात समाजाभिमुख योगदान देण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. सर्व रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक आणि समाजबांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास लहानांपासून मोठ्यांपर्यंत समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *