• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

भगवान गौतम बुद्ध जयंती भिंगारमध्ये उत्साहात साजरी

ByMirror

May 12, 2025
स्वच्छता अभियान व मिठाई वाटप

फुलांच्या वर्षावात बुध्द पुतळ्यास अभिवादन; धम्म विचारांवर मार्गदर्शन


स्वच्छता अभियान व मिठाई वाटप

नगर (प्रतिनिधी)- जगाला करुणा, क्षमा आणि शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती बुध्द पौर्णिमा भिंगारमधील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पावसाच्या रिमझिम सरीतही, जॉगिंग पार्कमधील भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य पुतळ्यास पुष्पवृष्टी करत उपस्थितांनी अभिवादन केले. या प्रसंगी जॉगिंग पार्कमध्ये स्वच्छता अभियानही राबविण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व बुद्ध वंदनेने करण्यात आली. यानंतर धम्ममित्र संजय भिंगारदिवे व विकास भिंगारदिवे यांनी त्रिशरण आणि पंचशील घेतले. जयंतीनिमित्त मिठाई वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, अशोक पराते, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, दीपक धाडगे, रतनशेठ मेहेत्रे, दीपकराव घोडके, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, रमेशराव वराडे, अभिजीत सपकाळ, सुधीरशेठ कपाळे, संजय भिंगारदिवे, सचिनशेठ चोपडा, विकास भिंगारदिवे, प्रकाश देवळालीकर, अनिल हळगावकर, शशिकांत पवार, राजू कांबळे, सरदारसिंग परदेशी, प्रांजली सपकाळ, सविता परदेशी, ईवान सपकाळ, संतोष लुणिया, सुहास देवराईकर, इंजी. नागेश खुरपे, मुन्ना वागस्कर, शेषराव पालवे, रामनाथ गर्जे, सिताराम परदेशी, नामदेवराव जावळे, योगेश चौधरी, प्रवीण परदेशी, हेमंत पंधारे, विशाल भामरे आदींसह अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय सपकाळ यांनी म्हणाले की, भगवान बुद्धांनी मानवजातीसाठी करुणा, अहिंसा, क्षमा, शांती, त्याग, सेवा आणि समर्पण यांसारख्या नीतिसूत्रांची शिकवण दिली. धम्माच्या माध्यमातून त्यांनी आदर्श जीवनाचा मार्ग दाखविला असल्याचे सांगितले.


तसेच सचिनशेठ चोपडा, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, रमेश त्रिमुखे, रमेश वराडे, सुवर्णा महागडे-भिंगारदिवे, विकास भिंगारदिवे यांनी आपल्या मनोगतातून भगवान बुध्दांच्या विचारांची माहिती देत जीवनात धम्म स्वीकारण्याचे आवाहन केले. बुद्धांनी दिलेली पंचशील शिकवण हीच खऱ्या अर्थाने जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवते, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमातून धार्मिक, नैतिक व सामाजिक मूल्यांची प्रेरणा उपस्थितांना देण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *