भ्याड हल्ल्याचा निषेध
नगर (प्रतिनिधी)- काश्मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बायसरन भागात झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा कौटुंबिक न्यायालय व कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
कौटुंबिक न्यायालयात झालेल्या श्रध्दांजली कार्यक्रमाप्रसंगी कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती संगीता ना. भालेराव, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष तथा विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, सचिव ॲड. राजेश कावरे, ॲड. शिवाजी कराळे, प्रबंधक एस.के. मोहोळकर, सहाय्यक अधीक्षक ए. आय. शेख, कर्मचारी एस.के. चव्हाण, ए.पी. झिंजे, आर.एस. गुंडू, ए.एस. तगारे, आर.ए. मोरे, एस.बी. आळकुटे, एल.एस. जाधव, एस.के. जाधव आदी उपस्थित होते. यावेळी मौन पाळून हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून दहशतवादी संघटनांना चोख उत्तर देण्याची मागणी केली.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….
काश्मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बायसरन भागात झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा कौटुंबिक न्यायालय व कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने निषेध नोंदवून या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती संगीता ना. भालेराव, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष तथा विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, सचिव ॲड. राजेश कावरे, ॲड. शिवाजी कराळे, प्रबंधक एस.के. मोहोळकर, सहाय्यक अधीक्षक ए. आय. शेख, कर्मचारी एस.के. चव्हाण, ए.पी. झिंजे, आर.एस. गुंडू, ए.एस. तगारे, आर.ए. मोरे, एस.बी. आळकुटे, एल.एस. जाधव, एस.के. जाधव आदी. (छाया-वाजिद शेख-नगर)