• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

सर्जेपूरा मधील राधाकृष्ण मंदिरात महाशिवरात्री साजरी

ByMirror

Feb 26, 2025
शिवलिंगाचा अभिषेक करुन महादेवाचा जयघोष

शिवलिंगाचा अभिषेक करुन महादेवाचा जयघोष

नगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिरात महाशिवरात्री भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. महादेवाच्या जयघोष करत शीख, पंजाबी समाजातील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती.


सकाळी मंदिरातील शिवलिंगाचा अभिषेक करुन विधीवत पूजा करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता, विश्‍वस्त व भाविकांच्या हस्ते महादेवाची आरती पार पडली. यावेळी भाविक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


भक्तीमय वातावरणात भजन मंडळीच्या वतीने भजन-कीर्तनाचा कार्यक्रम देखील रंगला होता. हर हर महादेवाच्या जय जयकाराने मंदिर परिसर दुमदुमून गेले. शाबुदाणा खिचडी व थंडाई प्रसादाचे वाटप करुन या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली. हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे सर्व विश्‍वस्त व समाजातील युवकांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *