मुंबईत झाला साहित्य क्षेत्रातील कार्याचा सन्मान
नगर (प्रतिनिधी)- येथील सुप्रसिद्ध कवयित्री, मुक्त पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सरोज आल्हाट यांना दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिवेशनल अवॉर्ड 2025 नुकताच प्रदान करण्यात आला. भगत मीडिया आर्ट ॲण्ड एंटरटेनमेंट (मुंबई) तर्फे त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबई येथील अंधेरी पश्चिम, लिंक प्लाझा येथे पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी अभिनेता मिहीर जयस्वाल, रणजीत कावळे, अभिनेत्री सीमा कुलकर्णी, सिने निर्माते अमोल भगत आदींसह सिनेमा, साहित्य, कला व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती देशभरातून उपस्थित होते. सरोज आल्हाट यांना यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.