• Mon. Jun 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

केडगावच्या सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरात बाल आनंद मेळावा उत्साहात

ByMirror

Dec 14, 2024
विद्यार्थ्यांनी गिरवले व्यावसायिकतेचे आणि कौशल्य विकासाचे धडे

जीवन वाचवायचे असेल तर शारीरिक कसरत महत्त्वाची- डॉ. रेखा झावरे.

विद्यार्थ्यांनी गिरवले व्यावसायिकतेचे आणि कौशल्य विकासाचे धडे

नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील डॉ. हेडगेवार शैक्षणिक संकुल संचलित सरस्वती प्राथमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि कौशल्य विकास होण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आनंद लुटला. यावेळी मुलांनी भेळ, पॅटिस, पाणीपुरी, ढोकळा, इडली, मॅगी तसेच शरीरासाठी पोषक असे पालेभाज्या व फळे हेही विक्री साठी आणण्यात आले होते.


या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन डॉ. अक्षयदीप झावरे व डॉ. रेखा झावरे यांच्या हस्ते झाले. शालेय समितीचे सदस्य संभाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बी.एड. कॉलेजचे प्राचार्य अमरनाथ कुमावत, मुख्याध्यापक संदीप भोर, मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी, विद्या भारतीचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी, प्रज्ञाताई आसनिकर, प्रा. मनोज कोतकर, विद्या भारतीचे सहमंत्री दादासाहेब काजळे, पालक प्रतिनिधी अनिलराजे झिरपे, अवि साठे, शिवाजी मगर आदींसह सर्व शालेय शिक्षक, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


डॉ. रेखा झावरे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान आवश्‍यक आहे. जगात टिकायचे असेल तर आलेल्या संकटावर मात करुन पुढे जात रहावे व स्वतः मध्ये बदल करा. मोबाईल व टीव्ही मध्ये गुंतून जात मैदानी खेळ खेळा, शरीरी व्यायाम केले पाहिजे. आपल्याला आपले जीवन वाचवायचे असेल तर शारीरिक कसरत केली पाहिजे. जंग फूड व फास्ट फूड खाणे टाळा, आणि पोषक आहार खाण्याचे त्यांनी आवाहन केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप भोर यांनी केले. या बाल आनंद मेळाव्यात विविध साहित्याचे प्रदर्शन, समाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या, आणि विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान होण्यासाठी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल थाटण्यात आले होते. विविध उद्योगांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. बाल आनंद मेळावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह पालकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता खिलारी यांनी केले. आभार अनिता क्षीरसागर यांनी मानले. सर्व शिक्षकानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *