• Mon. Jun 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात रविवारी तेली समाजाच्या निशुल्क वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन

ByMirror

Dec 14, 2024
शहरात रविवारी तेली समाजाच्या निशुल्क वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन

शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचार मंच आणि प्रदेश तेली महासंघाचा संयुक्त उपक्रम

समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहर व जिल्हा तेली समाज व संताजी विचार मंच (ट्रस्ट) आणि प्रदेश तेली महासंघाच्या वतीने रविवारी (दि.15 डिसेंबर) मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सावेडी येथील माऊली संकुल सभागृहात होणाऱ्या या मेळाव्यात सर्व समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील सात वर्षापासून मेळाव्याचे आयोजन केले जात असून, या मेळाव्याच्या माध्यमातून संपर्ण राज्यातील तेली समाज बांधव एकत्र येतात. दरवर्षी या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. यावर्षी देखील भव्य स्वरुपाचे नियोजन करण्यात आले आहे.


पंधराशे वधू वर असलेली फोर कलर पुस्तिका मेळाव्यातील वधू-वर पालकांना उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यात स्वत: वधू-वर उपस्थित राहणार आहेत. तसेच या मेळाव्यात सहभागी झालेल्या बांधवांसाठी सोडत पध्दतीने अनुक्रमे 32 इंची एलईडी टीव्ही, वधूसाठी पैठणी साडी व वरास सुट फॅब्रिक आणि वधू-वरास रिस्ट वॉचचे बक्षीस दिले जाणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *