• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

जागतिक दिव्यांग दिन साजरा

ByMirror

Dec 3, 2024
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत बौध्दिक अक्षम विदयार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत बौध्दिक अक्षम विदयार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप

दिव्यांगाच्या योजनांचा लाभ देवून दिव्यांगाचे जीवन सुकर करा -देविदास कोकाटे (समाज कल्याण अधिकारी)

नगर (प्रतिनिधी)- दिव्यांगाना योजनांचा लाभ देवून त्यांचे जीवन सुकर करा. त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन जि.प. चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांनी केले.
मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित मतिमंद मुलांची शाळा, ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळा व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमात कोकाटे बोलत होते.


जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक डॉ. दिपक अनाप यांनी जिल्हा पुनर्वसन केंद्र येथे राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मतिमंद विकास शिक्षण मंडळाचे मानद सचिव पी. डी. कुलकर्णी यांनी केले. यावेळी कार्यशाळेच्या निदेशक श्रीमती सुशिला जाधव यांनी दिव्यांग दिनाचे महत्त्व विशद केले. शाळेतील विद्यार्थ्यांना जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत बौध्दिक अक्षम विदयार्थ्यांच्या शिक्षणासाठीच्या कीटचे वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमास सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे इन्चार्ज डॉ. मेरीकर, मानसशास्त्रज्ञ अमृता साठे, पालक प्रतिनिधी नितीन अवचर, गिन्यानदेव जाधव, कार्यशाळेचे इन्चार्ज भाऊसाहेब कदम आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी कुटे यांनी केले. आभार शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक योगेश आल्हाट यांनी केले. या कार्यक्रमास पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *