• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

रस्त्यावर थंडीत कुडकुडणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप

ByMirror

Dec 2, 2024
रस्त्यावर थंडीत कुडकुडणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप

मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानचा उपक्रम

वंचितांना मायेची ऊब देण्याच्या भावनेने सामाजिक उपक्रम -सर्वेश सपकाळ

नगर (प्रतिनिधी)- थंडीनिमित्त शहरातील तापमानाचा पार खालवत असताना मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीने शहरात रस्त्याच्या कडेला, बस स्थानक परिसर व रेल्वे स्टेशन परिसरात रस्त्यावर झोपलेल्या गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. वाढती कडाक्याची थंडी पाहता अंगात हुडहुडी भरत असताना, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अल्ताफ सय्यद यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रोहन शेलार, नजीम कुरेशी, विकी पवार, ॲड. नरेंद्र भिंगारदिवे, डॉ. रोबीन तडके, क्षीरसागर सर आदी उपस्थित होते.


थंडीत उघड्यावर जीवन जगणाऱ्या गरजू, निराधारांना थंडीत अचानकपणे ऊबदार ब्लँकेटची भेट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण झाले होते. थंडीत कुडकुडणाऱ्यांना ब्लँकेट आधार देण्यात आला. अल्ताफ सय्यद म्हणाले की, मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम सातत्याने सुरु आहे. सामाजिक बांधिलकी जपून गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले असून, वंचितांना मायेची ऊब देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *