• Thu. Mar 5th, 2026

घर घर लंगर सेवेत जागतिक अन्न दिवस साजरा

ByMirror

Oct 23, 2024

मागील 27 महिन्यांपासून तारकपूर येथील अन्न छत्रालय सुरु

लंगर सेवेतून अनेक गरजूंची भागवली जातीय भूक; तर गरजू विद्यार्थ्यांना दिला जातो आधार

नगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून भुकेल्या गरजूंना जेवण पुरविणाऱ्या गुरु अर्जुन समाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेला पाच वर्ष झाले असून, मागील 27 महिन्यांपासून तारकपूर येथील अन्न छत्रालय सुरु आहे. जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने लंगर सेवेशी जोडली गेलेली सर्वात अवघ्या 5 वर्षाची सेवादार आश्‍नूर कौर करणसिंग धुप्पड व हरमन छाबरा यांच्या हस्ते केक कापून जेवणाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले.


शहरात कोणीही उपाशी झोपू नये, ही संकल्पना घेऊन कोरोना काळात शहरातमध्ये लंगर सेवा सुरु झाली होती. अद्यापि घर घर लंगर सेवेद्वारे तारकपूरच्या अन्न छत्रालयात दररोज सायंकाळी गरजू लोकांना अन्न पुरविण्याचे कार्य सुरू आहे. दररोज संध्याकाळी या सेवा कार्यात प्रतिष्ठित व्यक्ती योगदान देऊन स्वत: जेवणाचे पाकीटाचे पॅकिंग करुन वितरीत करत असतात. तसेच या वर्षी संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्याच्या प्रारंभी दीड हजार स्कूल बॅगसह शैक्षणिक कीटचे वितरण करण्यात आलेले आहे. शहरातील 48 शाळेत शैक्षणिक कीटच वाटप प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले. त्याचप्रमाणे श्रीरामपूर, नगर शहर, पारनेर, गोवा, कोल्हापूर आदी ठिकाणी गरजूंना याचा लाभ मिळाला.


केवळ अन्नपुरवठा, शैक्षणिक साहित्यच नव्हे, तर समाजातील गरजू मुला-मुलींना लांबच्या ठिकाणाहून शाळेत येण्यासाठी सायकलचे देखील वितरण करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून गरजूंना अन्न पुरविण्याबरोबरच वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात प्रगती साधण्यासाठी विविध उपक्रमातून प्रोत्साहन दिले जात आहे.


या सेवा कार्यासाठी सेवादार हरजीतसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, गुलशन कंत्रोड, प्रशांत मुनोत, मुन्नाशेठ जग्गी, डॉ. अमित बडवे, डॉ. संजय असनानी, राजू जग्गी, सोमनाथ चिंतामणी, कैलास नवलानी, करणसिंह धुप्पड, सनी वधवा, सुनील थोरात, सुनील छाजेड, विपुल शाह, मनोज मदान, अर्जुन मदान, राहुल बजाज, राजा नारंग, मन्नू कुकरेजा, काली नवलानी, प्रमोद पंतम, शरद बेरड, पुरुषोत्तम बेट्टी, दामोदर माखिजा, जय रंगलानी, किशोर रंगलानी, जतीन आहुजा, कबीर धुप्पड, अभिमन्यू नय्यर, सुनील मेहतानी, दीपक मेहतानी, राजेश कुकरेजा, किशोर मुनोत, जस्मित वधवा, गोविंद खुराणा, बलजीत बिलरा, सौरभ पोखरणा, अंकित भूतानी, संदेश रपारिया, अजय पंजाबी, सिमर वधवा, अमरजीत वधवा आदी योगदान देत आहे. तसेच या सेवा कार्यात लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लब ऑफ अहमदनगर या सामाजिक संस्थेचे सहकार्य लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *