• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

रामवाडी भागातील विकास कामांचे लोकार्पण

ByMirror

Oct 17, 2024
विकासापासून वंचित राहिलेल्या रामवाडीतील विकास कामे आमदार जगताप यांनी मार्गी लावली -शितलताई जगताप

आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून मार्गी लागले मुलभूत प्रश्‍न

विकासापासून वंचित राहिलेल्या रामवाडीतील विकास कामे आमदार जगताप यांनी मार्गी लावली -शितलताई जगताप

नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी भागात आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून झालेल्या विविध विकास कामाचे लोकार्पण माजी नगरसेविका शितलताई जगताप यांच्या हस्ते झाले. विकास कामाच्या माध्यमातून रामवाडी भागातील रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन व पथदिव्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्यात आला आहे.


या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे पाटील, पिटु गोधडे, राष्ट्रवादी पार्टीचे भिंगार शहर संघटक अक्षय पाथरीया, पूजा गोंडाळ, सचिन जगताप, पै. अश्‍विन खुडे, प्रकाश वाघमारे, सागर साठे, सतीश साळवे, सुरेश वैरागर, दिपक साबळे, नितीन बोरगे, किशोर उल्हारे, संदीप थोरात, अशोक भोसले, रतन परदेशी, चेतन लखापती, अक्षय उमाप, सचिन उमाप, सुभाष वाघमारे, सागर देठे, गणेश लबडे, दिपक लोखंडे, राजू कांबळे, अजय केंजरला, अमोल शेरकर, नंदन शेरकर आदींसह मावळा प्रतिष्ठाण व अखंड रामवाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शितलताई जगताप म्हणाल्या की, विकासापासून वंचित राहिलेल्या रामवाडी झोपडपट्टीतील विकास कामे आमदार संग्राम जगताप यांनी मार्गी लावली. सर्वसामान्य कष्टकरी वर्गातील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम त्यांनी केले. महत्त्वाचा पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईन व रस्त्याचा प्रश्‍न त्यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला आहे. पथदिव्यांची व्यवस्था करुन या परिसरातील अंधकार देखील दूर करण्याचे काम त्यांनी केले असून, रामवाडीचा विकासात्मक कामांनी कायापालट झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
निलेश म्हसे पाटील म्हणाले की, इतर राजकीय मंडळींनी रामवाडीला फक्त व्होट बँक म्हणून पाहिले. या परिसरातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित होते. मात्र आमदार जगताप यांनी या भागातील नागरिकांचे मुलभूत प्रश्‍न मात्र एकाच भेटीत प्रत्यक्ष पाहणी करून मनपा अधिकाऱ्यांना सूचना देऊन कामांची प्रक्रिया पार पाडून अल्पावधीतच सोडविले. रामवाडी झोपडपट्टीत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. पावसाळ्यात घरासमोरच पाण्याचे साचलेले डबले व चिखलाने माखलेले रस्त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे देखील अवघड होत होते. मात्र काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांमुळे या परिसराचे रुप बदलले आहे.तसेच रामवाडी तील उर्वरित परिसरातील कामे देखील लवकरच मार्गी लागणार असून, सर्वसामान्यांच्या हाकेला ओ देणारे आमदार म्हणून जगताप काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *