• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

तेलीखुंट येथे किंग्स मेन्स वेअर दालनाचा शुभारंभ

ByMirror

Oct 16, 2024
ब्रॅण्डेड कपडे व विविध दैनंदिन वापरातील साहित्य उपलब्ध

ब्रॅण्डेड कपडे व विविध दैनंदिन वापरातील साहित्य उपलब्ध

नगर (प्रतिनिधी)- तेलीखुंट येथे नव्याने झालेल्या किंग्स मेन्स वेअर दालनाचा शुभारंभ माजी नगरसेविका शितलताई जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन घोडके, शॉपचे संचालक प्रेम क्षेत्रे, प्रसाद गायकवाड, तेजस बिचकर, अमोल गायकवाड, रोनक बिचकर, प्रसन्न बिडकर, अमित कदम, मयूर भोसले, अभिषेक देशमुख, अक्षय दिंडे, गणेश मोरे, विपुल शेळके, अमन शेख, विशाल गोसावी, वैभव पाखरे, गणेश लेंडकर आदी उपस्थित होते.


शितलताई जगताप म्हणाल्या की, शहरात नव्याने झालेल्या किंग्स मेन्स वेअर दालनाच्या माध्यमातून ब्रॅण्डेड कपडे युवकांना उपलब्ध होणार असून, मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. विविध शॉपच्या माध्यमातून शहरातील बाजरपेठेला चालना मिळून रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


किंग्स मेन्स वेअरच्या माध्यमातून नगरकरांना विशेष दरामध्ये सर्व ब्रॅण्डचे शर्ट, पॅन्ट, जीन्स, बॉडी स्प्रे, वॉलेट, बेल्ट, वॉचेस, हुडी, गॉगल्स आदी दैनंदिन वापरातील स्टायलिश साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. चोखंदळ ग्राहकांना नवनवीन ब्रॅण्डचे साहित्य पसंतीस उतरणार असल्याची माहिती शॉपचे संचालक प्रेम क्षेत्रे व प्रसाद गायकवाड यांनी दिली. या दालनास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिल्या. आमदार संग्राम जगताप यांनी देखील नव्याने सुरु झालेल्या या दालनास शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *