• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

काटवन खंडोबा रोड येथील गाझी नगर परिसरात ड्रेनेजलाईनच्या कामाला प्रारंभ

ByMirror

Jan 11, 2025
काटवन खंडोबा रोड येथील गाझी नगर परिसरात ड्रेनेजलाईनच्या कामाला प्रारंभ

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न सुटणार

नगर (प्रतिनिधी)- प्रभागातील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्न राहिला आहे. निधी अभावी प्रभागातील कामे प्रलंबीत होती. महायुतीच्या सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेच्या माध्यमातून प्रभागातील सर्व विकास कामे मार्गी लागणार आहे. गाझी नगर परिसरात मागील काही वर्षापासून असलेली ड्रेनेज लाईनची समस्या सोडविण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच या भागातील काँक्रिटीकरण रस्ता व इतर नागरी प्रश्‍न देखील सोडविले जाणार असल्याचे आश्‍वासन नगरसेविका सुवर्णाताई जाधव यांनी


काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथे नगरसेविका सुवर्णाताई जाधव यांच्या प्रयत्नाने 450 एमएम व्यासच्या ड्रेनेजलाईन टाकण्याच्या कामाचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी जाधव बोलत होत्या. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अनिल शिंदे, दिपक खैरे, प्रशांत गायकवाड, दत्ताभाऊ जाधव, हजराबी शेख, हसिना शेख, सकिना शेख, कमल दातरंगे, शमीम सय्यद, कमल इंगळे, कौसर पठाण, परवीन बागवान, ताराबाई सुडके, विकास पाचारणे, सुनिल सुडके, अरबाज बागवान, अजीज सय्यद, हिराबाई पाचारणे, शाईन शेख, अकबर शेख, अज्जू शेख, शौकत शेख, नजीर पठाण, मुदस्सर शेख आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


अनिल शिंदे म्हणाले की, प्रभागातील सदर परिसरात नगरसेविका सुवर्णाताई जाधव यांनी विविध प्रश्‍न सोडविण्याचे काम केले आहे. नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी ते सत्तेच्या प्रवाहात आले असल्याने अनेक प्रलंबीत विकास कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेवक दिपक खैरे व प्रशांत गायकवाड यांनी सर्व नगरसेवक एकत्रित येऊन प्रभागातील विविध प्रश्‍न सोडविण्याचे काम करत असल्याची माहिती दिली.


गाझी नगर परिसरात काही वर्षांपासून सतत ड्रेनेजलाईन तुंबत असल्याने नागरिकांना दुर्गंधी, नळाद्वारे घाण पाणी येणे व आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या प्रश्‍नाची दखल घेऊन तातडीने 20 लाख रुपये खर्च करुन 450 एमएम व्यासच्या ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नागरिकांनी सुरु झालेल्या ड्रेनेजलाईनच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *