• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघातील हिंदू-मुस्लिम महिलांनी एकत्रित घेतले मोहटा देवीचे दर्शन

ByMirror

Oct 11, 2024
दरवर्षी महिलांना देवीच्या दर्शनाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व -पै. नाना डोंगरे

निमगाव वाघातून खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या देवी दर्शन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दरवर्षी महिलांना देवीच्या दर्शनाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथून खासदार निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने महिला भाविकांना श्री क्षेत्र मोहटा देवी (ता. पाथर्डी) दर्शन पाठविण्यात आले. या उपक्रमास गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर मुस्लिम महिला देखील देवीच्या दर्शनाला रवाना झाल्या.


गावातून देवीच्या दर्शनाला पाच लक्झरी बस सोडण्यात आल्या. दरवर्षी प्रमाणे या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना मोफत मोहटा देवीचे दर्शन घडविण्यात आले. मोहटा देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या बसचे पूजन करुन गाड्या रवाना करण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी बस चालकांचा सत्कार केला. याप्रसंगी माजी सरपंच साहेबराव बोडखे, राम पवार, डॉ. विजय जाधव, भरत बोडखे, रवी जाधव, सचिन जाधव, अतुल फलके, बापू फलके, भाऊसाहेब ठाणगे, कुसुम बोडखे, सिंधू जाधव, ज्योती फलके, गोरख चौरे, गोरख डोंगरे, सुभाष जाधव, ज्ञानदेव जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, दरवर्षी महिला वर्गाला खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून देवीच्या दर्शनाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व आहे. महिलांचा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हिंदू-मुस्लिम महिला एकत्रितपणे गेलेल्या देवी दर्शनातून गावातील धार्मिक एकता दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांना देवीला घेऊन जाणारे लक्झरी बसचे चालक बाळासाहेब दहातोंडे, अमोल देठे, ऋषीकेश ताठे, सचिन मोहिते, प्रतिक घायतडक यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्या वतीने महिला भाविकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.


नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून खासदार निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला भाविकांना श्री क्षेत्र मोहटा देवी (ता. पाथर्डी) दर्शन घडविण्याचा उपक्रम सुरु आहे. सातव्या माळेला निमगाव वाघातील महिलांना देवीचे दर्शन घडविण्यात आले. महिला भाविकांना उपवासाचे फराळ, नाश्‍ता, पाणी बॉटल, फळे आदींची सोय करण्यात आलेली होती. तर महिलांना चांगल्या पद्धतीने मोहटा देवीचे दर्शन घडविण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *