आलेल्या भाविकांना फराळ व फळांचे वाटप
तर श्रीराम मंदिरात वृक्षारोपण
अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त बुऱ्हाणनगरच्या अंबिका माता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फराळ व फळांचे वाटप करण्यात आले. मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. तर या भागातील बाणेश्वर कॉलनी मधील श्रीराम मंदिरात वृक्षारोपण करण्यात आले.
वर्षभर आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिनच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सीए रवींद्र कटारिया, जालिंदर बेल्हेकर, सुनील बग्गन, श्रीरंग देवकुळे, विलास आहेर, रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, सुमेश केदारे, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, दिलीप गुगळे, संजय भिंगारदिवे, अभिजीत सपकाळ, दिपक धाडगे, मनोहर तरवडे, सचिन पेंढूरकर, जहीर सय्यद, सुभाष पेंढूरकर, सुधीर कपाळे, अशोक पराते, अनिल सोळसे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, अविनाश पोतदार, राजू कांबळे, रतन मेहेत्रे, शेषराव पालवे, सुहास ढुमणे, कन्हैय्या बुंदेले, प्रकाश देवळालीकर आदींसह सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय सपकाळ म्हणाले की, सर्व धर्म-अध्यात्म निसर्गाशी जोडले गेलेले आहे. निसर्गात देवाचे अस्तित्व आहे. प्रत्येक धार्मिक सण-उत्सवातून हरदिनच्या माध्यमातून आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची जागृती केली जाते. प्रत्येक नागरिकांनी या चळवळीत योगदान दिल्यास बदल घडणार आहे. आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे निसर्गाचे आरोग्य सुधारण्यासाठी वृक्षरोपण काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले.
सीए रवींद्र कटारिया म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपने आपल्या सामाजिक कामातून एक आदर्श निर्माण केला आहे. समाजाची गरज ओळखून हा ग्रुप निस्वार्थ भावनेने योगदान देत आहे. प्रत्येकाचे जीवन आरोग्यमयी होण्यासाठी सर्वांना या मोहिमेत सहभागी करुन घेतले जात आहे. तर प्रत्येक ग्रुपचा सदस्य सामाजिक कार्याशी जोडला गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रुपच्या सदस्यांनी बुऱ्हाणनगर देवी मंदिराच्या परिसरात पसरलेल्या कचऱ्याचे संकलन करुन परिसराची स्वच्छता केली. या अभियानात ग्रुपच्या सदस्यांसह भाविक देखील सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी जालिंदर अळकुटे, भाऊसाहेब भांड, योगेश चौधरी, अशोक लोंढे, शैलेंद्र तरवडे, तुषार घाडगे, शिरीष पोटे, सखाराम अळकुटे, दत्तात्र्य लाहुंडे, मेजर विनोद खोत, अविनाश जाधव, कुमार धतुरे, महेंद्र तरवडे, भरत कनोजिया, प्रमोद तरवडे, प्रसाद तरवडे, अविनाश जाधव, रामेश्वर बुंदेले, उदय तरवडे, केतन तरवडे, दशरथ मुंडे, संतोष लुणिया यांनी परिश्रम घेतले.