• Sat. Jul 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

मनीषा गायकवाड राष्ट्रीय निसर्ग पर्यावरण पुरस्काराने ठाणे येथे सन्मानित

ByMirror

Oct 1, 2024

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची चळवळ रुजवून विविध कार्य केल्याचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रासह पर्यावरण क्षेत्रात योगदान देणाऱ्या भिंगार हायस्कूलच्या पर्यवेक्षिका मनीषा प्रफुल्ल गायकवाड यांना ठाणे येथे राष्ट्रीय निसर्ग पर्यावरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या (ठाणे) वतीने आयोजित निसर्ग साधना सामाजिक संमेलनात गायकवाड यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.


ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालय, रेघे सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ अभिनेते चंद्रशेखर कुलकर्णी, माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक दिनेश उघडे, सिने अभिनेते जाकीर खान, दिर्ग्दशक व लेखक अल्ताफ शेख, प्रा.डॉ. बी एन खरात, संस्थेचे अध्यक्ष विशालभाऊ देशमुख आदी उपस्थित होते.


गायकवाड या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मागील 28 वर्षापासून योगदान देत आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाची आवड निर्माण करुन पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. वृक्षरोपण, संवर्धन, एक व्यक्ती एक झाड आदी उपक्रमाद्वारे व व्याख्यानातून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला गती देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *