• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

ललिता गवळी यांचे निधन

ByMirror

Jul 23, 2024

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील आंदोलन व सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. कारभारी गवळी यांच्या पत्नी ललिताताई गवळी यांचे दिर्घ आजाराने रविवारी (दि.21 जुलै) रात्री निधन झाले. त्या 60 वर्षाच्या होत्या.

धार्मिक व सामाजिक कार्याची आवड असल्याने ते सर्वांना सुपरिचित होत्या. त्यांच्या पश्‍चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची मुलगी स्नेहल गवळी जर्मनीत डॉक्टर आहे. तर मुलगा ॲड. अमोल गवळी हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात वकील आहे.

ललिताताई यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि.22 जुलै) सकाळी नालेगाव येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *