• Sun. Jun 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

जीएसटीच्या अडीअडचणी संदर्भात महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे निवेदन

ByMirror

Jul 15, 2024
जीएसटीच्या अडीअडचणी संदर्भात महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे निवेदन

सीजीएसटी आयुक्तांनी केला लहामगे यांचा सत्कार

जीएसटी नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अधिक समस्या निर्माण होणार -के.के. श्रीवास्तव

अहमदनगर (प्रतिनिधी)- जीएसटी कार्यालय व्यापाऱ्यांना कधीही विनाकारण किंवा चुकीच्या नोटीसा पाठवत नाही. करदात्याने वेळोवेळी दाखल केलेले जीएसटी रिटर्न व कराचा भरणा या माहितीच्या आधारे जीएसटी कार्यालयाकडून नोटीस पाठवून त्यावर खुलासा मागितला जातो. जीएसटी नोटीस मिळाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा भविष्यात अधिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर ऑडिट बाबत सहकार्य करून आपली प्रलंबित प्रकरणे ताबडतोब मार्गी लावावी. समस्या असल्यास थेट जीएसटी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सीजीएसटी आयुक्त के.के. श्रीवास्तव यांनी केले.


जीएसटी कायद्याला सात वर्षे पूर्ण होत असल्याने जीएसटी कायदा व लेखापरीक्षण या विषयावर नाशिक येथील केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या वतीने कर सल्लागार, व्यापारी व प्रॅक्टिशनर्स यांच्यासाठी आयोजित चर्चा सत्राप्रसंगी श्रीवास्तव बोलत होते. यावेळी यावेळी केंद्रीय वस्तू व सेवा कर उपायुक्त संदीप हेडाऊ, अवधेश शर्मा, सहाय्यक आयुक्त वसंत तुपलोंढे, सतीश दांडगे, अशोक सरकार, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोंगरे, जॉइंट सेक्रेटरी आनंद लहामगे, संदेश कजवाडकर, अनिल चव्हाण, योगेश कातकडे, सीए हेमंत डागा, अंबादास गाजुल, धरमचंद पारख, नयन निऱ्हाळी, पंकज भामरे, अक्षय सोनजे, नितीन फिरोदिया, अनिकेत कुलकर्णी, आरिफ खान मन्सूरी आदींसह कर सल्लागार उपस्थित होते.


पुढे श्रीवास्तव यांनी जीएसटी कर संकलनात कर सल्लागार यांचे महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. अप्पर आयुक्त अनुश्री हर्डीकर यांनी कर संकलनामध्ये करसंकलनामध्ये कर सल्लागार हे जीएसटी विभागाचा कणा असल्याने, कर संकलनात मोलाची भूमिका बजावत असल्याचे नमूद केले. संयुक्त आयुक्त शंतनू यांनी जीएसटी ऑडिट एक मर्यादित कार्य असून कायद्यातील तरतुदींचे पालन करणे आवश्‍यक असल्याचे सांगितले.



आनंद लहामगे यांची नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या जॉइंट सेक्रेटरीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सीजीएसटी आयुक्त के.के. श्रीवास्तव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर संघटनेच्या वतीने जीएसटीमध्ये येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात श्रीवास्तव यांना निवेदन देण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *