• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

म्हसणे येथील तुकाई मंदिर परिसरात 1 हजार झाडांची लागवड

ByMirror

Jul 12, 2024
म्हसणे येथील तुकाई मंदिर परिसरात 1 हजार झाडांची लागवड

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचा सामाजिक उपक्रम

संपूर्ण राज्यात संघटनेच्या वतीने गाव पातळीवर वृक्षरोपण मोहिम राबविली जाणार -रघुनाथ आंबेडकर

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश (महाराष्ट्र राज्य) संघटनेच्या वतीने म्हसणे सुलतानपूर (ता. पारनेर) येथील तुकाई मंदिर परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे व युनिटी बिल्ड टेक प्रा.लि. कंपनीच्या माध्यमातून 1 हजार झाडांची लागवड करण्यात आली.


या अभियानाचे प्रारंभ भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे व सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आढाव यांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आले. यावेळी युनिटी बिल्ड टेकचे शैलेंद्र गाडेकर, श्री समर्थ उद्योग समूहाचे संस्थापिका शिल्पा गाडीलकर, प्रदेश अध्यक्ष रघुनाथ आंबेडकर, सामाजिक कार्यकर्ते प्रतीक शेळके, भीम आर्मीचे पुणे जिल्हाध्यक्ष संदीप शेलार, म्हसणे ग्रामपंचायत सदस्य संतोष तरटे, तंटामुक्ती अध्यक्ष विकास गुंड, बाळू दादा जंबे, सरपंच विलास काळे, अनिल तरटे, चेअरमन विलास तरटे, उमेश गायकवाड, शंकर तांबे, ऋषिकेश पठारे, अनिल ठोंबरे, अलकाताई झरेकर, अविनाश उबाळे, अजय पठारे, सोमनाथ तरटे, बाबाजी गुंड, गणेश गुंड, रवी पठारे, सचिन पठारे, निलेश बागल, गणेश बागल आदींसह म्हसने गावातील ग्रामस्थ व समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.


प्रतीक शेळके म्हणाले की, निसर्ग मानवाला खूप काही देत असतो, याची जाणीव ठेऊन निसर्गाचे देणे लागते या भावनेने प्रत्येकाने वृक्षारोपण करावे. निसर्गाप्रती प्रत्येकाच्या मनात कृतज्ञतेची भावना वृध्दींगत झाल्यास पर्यावरण संवर्धन चळवळीला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेश अध्यक्ष रघुनाथ आंबेडकर म्हणाले की, प्रत्येकाने कर्तव्य म्हणून निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे. निसर्ग हा सजीव सृष्टीचा पाया असून, निसर्गावर घाला घातला जात असल्याने त्याचे दुष्परिणाम तापमान वाढ, बदलेले ऋतू, अवकाळी पाऊस यातून दिसत आहे. संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात गाव पातळीवर वृक्षरोपण मोहिम राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी निसर्गाच्या संवर्धनासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय असून, त्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून जगविण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे म्हणाले की, मानवाचे कल्याण व अस्तित्व निसर्गाशी जोडलेले असून, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने झाडे लावण्याची गरज आहे. मानवाने आपल्या सुख-सोयींसाठी निसर्गाचे शोषण करुन त्याची मोठी हानी केली. निसर्गाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी प्रत्येकाने झाड लावण्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *