• Sun. Jun 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

मानांकित खेळाडू विजय संपादन करुन उपांत्यपूर्व सामन्यात दाखल

ByMirror

Jul 11, 2024
मानांकित खेळाडू विजय संपादन करुन उपांत्यपूर्व सामन्यात दाखल

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा

अहमदनगरच्या विधी सैनी, आर्यन राठोड, अनन्या सोले, निरजा गुगळे, साची अग्रवाल, स्वरुप सोमानी विजयी

अहमदनगर (प्रतिनिधी)- बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमीच्या वतीने कै. श्रीमती संजीवनी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या 17 वर्षा आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा आणि 15 वर्ष आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील वैयक्तिक सामन्यांमध्ये मानांकन असलेल्या खेळाडूंनी आपल्या गटामध्ये विजय संपादन करुन आघाडी घेतली आहे. 17 व 15 वर्षा आतील मुला-मुलींचे वैयक्तिक सामने चुरशीचे होत आहे.


32 जिल्ह्यातील सहाशे खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत मंगळवार (दि.9 जुलै) पासून वैयक्तिक सामन्यांना प्रारंभ झाले आहे. मंगळवारी 290 तर बुधवारी (दि.10 जुलै) 300 वैयक्तिक सामने पार पडले. 17 व 15 वर्षा आतील मुला-मुलींचे प्रत्येकी 5 असे एकूण 10 इव्हेंट झाले. यामध्ये अहमदनगरच्या विधी सैनी, आर्यन राठोड, अनन्या सोले, निरजा गुगळे, साची अग्रवाल, स्वरुप सोमानी यांनी विजय संपादन करुन आगेकूच केली आहे.


गुरुवारी (दि.11 जुलै) उपांत्यपूर्व सामने होणार आहे. मानांकन असलेले उत्कृष्ट खेळाडूंचे या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण पाहता येणार आहे.


अहमदनगरचे खेळाडूंनी वैयक्तिक सामन्यात यश संपादन केले असून, त्याचा निकाल पुढीलप्रमाणे:-
15 वर्षा आतील मुली- विधी सैनी (अहमदनगर) विरुध्द सरुजा काजळकर (विधी सैनी विजयी 15-4, 15-7),
मिश्र दुहेरीत आर्यन राठोड व अनन्या सोले (अहमदनगर) विरुध्द रुद्र सईद (कोल्हापूर) व क्षितीजा पाटील (सांगली) (राठोड व सोले विजयी 12-15, 16-14, 15-8), निरजा गुगळे व साची अग्रवाल (अहमदनगर) विरुध्द श्रावणी माहोरकर व सृष्टी पाटील (बीड) (गुगळे व अग्रवाल विजयी 12-15, 15-7, 15-8).
मुले दुहेरीत- सात्वित केला (अकोले) व स्वरुप सोमानी (अहमदनगर) विरुध्द ध्रुव भोले व वेदांत तांदळे (पुणे) (केला व सोमानी विजयी 10-15, 15-4, 15-12.
17 वर्षा आतील मुली- अनन्या सोले (अहमदनगर) विरुध्द श्रार्दुली माळी (अनन्या सोले विजयी 15-10, 15-11)

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *