• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

दहिवाळ सराफ खरवंडीकरला महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार प्रदान

ByMirror

Jul 6, 2024
दहिवाळ सराफ खरवंडीकरला महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार प्रदान

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- 1978 पासून सुवर्ण व्यवसायात असलेल्या दहिवाळ सराफ खरवंडीकर यांना नाशिक येथे महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. रिसेल डॉट इन प्रस्तुत पुरस्कार प्रदान सोहळ्यात दहिवाळ सराफचे संचालक सचिन दहिवाळ यांना सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.


रिसेल डॉट इनच्या वतीने औद्योगिक व विविध व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी पुरस्कार दिला जातो. दहिवाळ सराफ खरवंडीकर यांनी सराफ व्यवसायात मोठे यश मिळवले असून, ग्राहकांमध्ये मोठा विश्‍वास संपादन केला आहे. ग्राहकांसाठी विविध योजना राबवून त्यांना सेवा देण्याचे काम ते करत आहे. त्यांच्या सराफ व्यवसाय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल दहिवाळ परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *