• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

अनिता काळे मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित

ByMirror

Jun 24, 2024
अनिता काळे मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सुरु असलेल्या कार्याबद्दल शिक्षिका तथा मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांना मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्या वतीने आझाद मैदान येथील पत्रकार भवनात 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ (लखुजी जाधवराव) यांचे सोळावे वंशज श्रीमंत संभाजीराजे जाधव यांच्या हस्ते काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


या पुरस्कार सोहळ्यासाठी उद्योजिका संगिताताई गुरव, मॉडेल स्मिता भोसले-धुमाळ, मुंबई महापालिकेचे माजी महापौर महादेव देवळे, सुभाष गायकवाड, तेजस्विनी गलांडे, स्वािगताध्यक्ष देवानंद कांबळे, महासंघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सचिव सुरज भोईर आदी उपस्थित होते.


अनिता काळे या सामाजिक क्षेत्रात मागील पंचवीस वर्षापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करुन शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण मोहिम चालवित आहे.

महिला सक्षमीकरणाचे कार्य करुन त्यांनी उत्तम प्रकारे महिलांचे संघटन केले आहे. व्याख्यानातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार घराघरात पोहचवून सक्षम पिढी घडविण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *