• Mon. Jun 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

माजी सैनिक कारभू थोरात यांचे निधन

ByMirror

Jun 6, 2024
कारभू थोरात

अहमदनगर (प्रतिनिधी)- पिंपरी जलसेन (ता. पारनेर) येथील माजी सैनिक कै. कारभू (भाऊ) भागुजी थोरात यांचे वृध्दापकाळाने नुकतेच निधन झाले. ते 76 वर्षाचे होते. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी विविध क्षेत्रात योगदान दिले.

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे ते संस्थापक चेअरमन होते. लष्करात केलेल्या देशसेवेनंतर त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेची स्थापना केली. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, नातवंड, सुना असा परिवार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *