खेळाडूंना सहभागी होण्याचे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे आवाहन
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या 20 वर्षा खालील खेळाडूंसाठी होणाऱ्या स्वामी विवेकानंद नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी 12 एप्रिल रोजी भुईकोट किल्ला येथील फुटबॉलच्या मैदानावर होणार असून, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सचिव रौनप फर्नांडीस यांनी केले आहे.
या निवड चाचणीत सहभागी झालेल्या खेळाडूंमधून दोन खेळाडूंची निवड मुंबई येथे 22 एप्रिल रोजी होणाऱ्या महाराष्ट्राच्या संघ निवडीसाठी प्रशिक्षण शिबिरात पाठविण्यात येणार आहे. 12 मे पासून नारीनपूर, छत्तीसगढ येथे स्वामी विवेकानंद नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा रंगणार आहे.
जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडूंना महाराष्ट्राच्या संघात जाण्याची संधी या निवड चाचणीद्वारे उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रदीप जाधव, व्हिक्टर जोसेफ व जेव्हिअर स्वामी यांनी दिली.
शहरात होणाऱ्या निवड चाचणीत 20 वर्षा आतील 1 जानेवारी 2005 नंतर जन्मलेले व 31 डिसेंबर 2007 च्या आतील जन्म झालेल्या खेळाडूंना सहभागी होता येणार आहे.
