• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

पंकजाताई मुंडे यांचे खांडरे परिवाराच्या वतीने शहरात स्वागत

ByMirror

Mar 23, 2024

अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे माजी उपमहापौर स्व. ज्ञानेश्‍वर खांडरे परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. मुंडे यांनी ऋषिकेश खांडरे यांच्या कॅफे हाऊसला भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऋषिकेश खांडरे, एकनाथ खांडरे, सागर खांडरे, विनायक खांडरे, अनिल यलमामे, विजय खांडरे, भीमराज आव्हाड, सिद्धेश खांडरे, श्रीनिवास नल्ला, संजय सानप, संजय बडे, दत्तात्रय भगत, प्रशांत आनंदकर, संकेत कंटाळे, प्रकाश तलरेजा, गणेश पाटील, अनिकेत कंटाळे आदी उपस्थित होते.


ऋषिकेश खांडरे म्हणाले की, स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर सर्व समाज पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाकडे मोठ्या आशेने पाहत आहे. त्यांच्या मागे संपूर्ण समाज उभा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पंकजाताई मुंडे यांनी नगरकरांच्या स्वागताने व प्रेमाने भारावले असल्याची भावना व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *