• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

नोटरीपदी नियुक्ती झाल्याबद्दल ॲड. प्रभाकर शहाणे यांचा रामवाडीत सत्कार

ByMirror

Mar 19, 2024

ॲड. शहाणे हातावर पोट असलेल्या वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर -विकास उडानशिवे

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी ॲड. प्रभाकर शहाणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा रामवाडीतील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विकास उडानशिवे, सनी चखाले, विकास वाल्हेकर, विकास घाडगे, दिपक साबळे, निखिल कोल्हे आदी उपस्थित होते.


विकास उडानशिवे म्हणाले की, रामवाडीतील लहान-मोठे भांडण, तंटे, कौटुंबिक वाद आदी प्रकरणामध्ये ॲड. प्रभाकर शहाणे हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असतात. प्रकरण न्यायालयापर्यंत गेल्यास माफक शुल्कात ते वकीलपत्र घेवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात.

रामवाडीत प्रत्येकाच्या मदतीला धावणारे व सर्वांना कायद्याचा योग्य सल्ला देणारे ॲड. शहाणे यांची नोटरीपदी झालेली नियुक्ती सर्व रामवाडीतील नागरिकांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *