• Sun. Jul 20th, 2025

बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानची बालघर प्रकल्पातील वंचित मुलांसाठी मदत

ByMirror

Jan 1, 2024

गरजेच्या साहित्यासह अन्न-धान्याची भेट

वंचित मुलांच्या हस्ते बागडपट्टीचा राजा श्री गणेशाची महाआरती

अहमदनगर (प्रतिनिधी)- बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान (ट्रस्ट) च्या वतीने तपोवन रोडच्या बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ व निराधार मुलांना गरजेचे साहित्य व अन्न-धान्याची मदत करण्यात आली. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर यांच्या पुढाकाराने बागडपट्टी येथे हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात प्रतिष्ठानच्या युवकांनी बालघर प्रकल्पातील मुलांना जवळ करुन त्यांच्याशी संवाद साधला. तर मुलांना केक, ड्रायफूट व अल्पोपहाराचे वाटप केले.


प्रारंभी बागडपट्टीचा राजा श्री गणेशाच्या मुर्तीची मुलांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी मार्गदर्शक अजय बोरा, सुरेश म्याना, संजय कांबळे, दत्ताभाऊ बेत्ती, मनिष नराल, रामदास शेरकर, सचिन नराल, महेश सब्बन, सुजित म्याना, हरिष बल्लाळ, प्रकाश जोशी, अमोल डफळ, विनायक गोसके, गणेश चिटमील, किरण डफळ, अजय दराडे, विकी मेहरा, किशोर लगडे, प्रितेश डफळ, बबलू राजपुत, शुभम देहरेकर, सुमित गोसके, प्रथमेश संभार, संकेत सुपेकर, जसमित राजपुत, साहिल जरे, चैतन्य घाडगे, शंभु पाचारे आदीसह प्रतिष्ठानचे युवक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजय बोरा म्हणाले की, बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान (ट्रस्ट) सामाजिक बांधिलकी जपून योगदान देत आहे. कोरोना काळातही प्रतिष्ठानने गरजूंना आधार दिला. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असताना गणेशोत्सव काळात घेतलेले उपक्रम वाखण्याजोगे आहे. युवकांना समाजकारणाची दिशा देऊन उत्तमपणे सेवा कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


दिलदारसिंग बीर म्हणाले की, बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानने सामाजिक कार्यातून शहरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. युवकांना संघटित करुन सातत्याने सामाजिक कार्य सुरु आहे. गणेशोत्सव काळात व वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. सामाजिक बांधिलकी जपून वंचित मुलांना आधार देण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *